जाय बरोबरी नामया तू
333.
जाय बरोबरी नामया तू जाय । न चले उपाय काही येथे ॥1॥
करु काय मज पडिले सांकडे । उल्लंघेना भीड मज याची ॥2॥
नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा । एक विज्ञापना परिसावी ॥3॥
कटावरी कर नाही ज्या देवाचे । न घे मी तयाचे दरुशन ॥4॥
मारिताचि हाक यावे त्वा झडकरी । बरे म्हणे हरि नामयासी ॥5॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान चांगया । जनी म्हणे तया सांगतसे ॥6॥
