नव्हे ते कैसे दिसो ल
323.
नव्हे ते कैसे दिसो लागले । पाहो गेलो ते नामयाने खादले ॥१॥
कोणा वो सांगू कोणा वो सांगू । कोणा वो सांगू नामदेवा ॥२॥
दृष्टीचे परते दृष्टिच भासले । दृश्य आणि दृष्टी नामया लागले ॥३॥
चोखा म्हणे ते नामया फावले । मुळींचे संचले जेसे तैसे ॥४॥
