वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 17. थालीपाक

ऐशा धाल्या ऋषिपंक्ती

🙏 16. संत जनाबाई · ABH-073879 · अभंग क्र. ३२८

328.
ऐशा धाल्या ऋषिपंक्ती । ढेकर आनंदाचे देती ॥1॥
तृप्ति बाणली सर्वासी । तरी आवड अन्नापाशी ॥2॥
उठले हात प्रक्षाळुनी । विडे घेतले सर्वानी ॥3॥
न बैसवे सुखासनी । अवघे प्रवर्तले शयनी ॥4॥
ते देखोनि निद्रिस्थ । साही जणे झाली गुप्त ॥5॥
माया निर्मियेली जैसी । आता गुप्त झाली तैसी ॥6॥
कोणा न कळे याची करणी । म्हणे नामयाची जनी ॥7॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग