विधात्याएवढा तपोनिधि
329.
विधात्याएवढा तपोनिधि होता ।
त्यासी त्या तत्वता ठकियेले ॥१॥
ऐसे तुझे खेळ खेळसी विलगट ।
भोगविसी कष्ट जीवालागी ॥२॥
विष्णूसी ठकिले नारदा विटंबिले ।
शंकराचे केले लिंगपतन ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे सांगता अपार ।
मना तुझे चार न कळती ॥४॥
