वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ९, करुणा > अभंग ३२६ ते ३२९

रंगा येई वो रंगा येई

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075023 · अभंग क्र. ३२८

328.
रंगा येई वो रंगा येई वो ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ।
वैकुंठवासिनी वो जगत्रजननी वो ।
तुझा वेधु माझे मनी वो ॥
कटी कर विराजित ।
मुकुट रत्नजडित पीतांबरू कसिला ।
तैसा येई का धावत ॥
विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो ।
तुझे ध्यान लागो बापरखुमादेवीवरे वो ॥

अर्थ :
माझ्या प्रेमरूपी भजनरंगांत हे विठाबाई देवी तू लवकर ये. तुला किती, नांवे आहेत म्हणून सांगावे ? तुला किठाई म्हणतात. तुला विठाई, कृष्णाई व कान्हाई म्हणतात. वैकुंठात राहाणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे. तू कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. कमरेला पितांबर आहे. अशा त-हेच्या देविरूप विठ्ठला तू माझे भजन रंगात धावत ये. हे विश्वरूप, विश्वेश्वरै कमलनयने, कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे ध्यान माझ्या मनांस नित्य लागो असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग