वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जोहरियापासी न चले खो

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075916 · अभंग क्र. ३३३

333.
जोहरियापासी न चले खोटे कुडे ।
तैसे संतांपुढे मन मग ॥१॥
आपणचि कळे भल्याचे लक्षण ।
नलगे पुसणे येरयेरा ॥२॥
मन मुरोनिया जे जे वर्तणूक ।
आपणचि देख उमटे आंगी ॥३॥
शांती क्षमा दया डोलती सर्वांगी ।
नुरे उपभोगी वासना काही ॥४॥
भागलीया ढोरा भेटे पाणी-छाया ।
मुरकुंडी त्या ठाया मिठी मारी ॥५॥
मरिता ढळेना उठविता उठेना ।
बहेणि म्हणे जाणा तैसे सुख ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग