वश मन जाले मग काय उर
332.
वश मन जाले मग काय उरले ।
ब्रह्मांड घातले पालथे जेणे ॥१॥
ऐसे पुण्य करा मनासी या वरा ।
सद्गुरूचे धरा पाय आधी ॥२॥
मन वश होता साधने साधिता ।
ब्रह्मसायुज्यता रोकडेची ॥३॥
मन जो नाकळे मग केवी कळे ।
बापाचि सोहळे साधनाचे ॥४॥
मन नाही ठायी सांगे घेउनी कायी ।
झकवावयाही अज्ञानासी ॥५॥
बहेणि म्हणे येथे केले ते आपण ।
जेवी त्याची खूण वाढिता जाणे ॥६॥
