एक पाहता दुजे गेले ।
325.
एक पाहता दुजे गेले ।
शेखी पाहता सर्व शून्य जाले ॥
पाहाता तयाचा विचारू ।
निवृत्ति जाणे तो श्रीगुरू ॥
एक मूळ एक आदि ।
शून्य मांडिली उपाधि ॥
निवृत्तिदासाचे बोलणे ।
जाणा मीपणा उमाणे ॥
अर्थ :
ब्रह्माविषयी पाहु गेले असता. तेथे द्वैत व अद्वैत किंवा एकत्व अनेकत्व ही भाषा संपते. त्या श्रुती वाक्याप्रमाणे सर्वाचे अधिष्ठान ब्रह्मच ठरते. ह्या संबंधीचा विचार श्रीगुरु निवृतीरायांच्या कृपेने केला आहे. शुन्य उपाधीने हा परमात्मा या जगाचे आदीमुळ आहे. माझे हे बोलणे मीपणा टाकुन समजुन घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
