ऐशापरी पांडवांते । र
330.
ऐशापरी पांडवांते । रक्षियेले दीनानाथें ॥1॥
शंखचक्र आयुधे करी । छाया पितांबर करी ॥2॥
हस्त ठेऊनिया माथा । सुखी असा निर्भय चित्ता ॥3॥
आज्ञा घेउनी सर्वाची । देव गेले द्वारकेसी ॥4॥
सरला थालिपाक आता । पुढे सावधान श्रोता ॥5॥
कथा पुढील गहन । घोषयात्रा निरुपण ॥6॥
येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस ॥7॥
