तुज साधावया एकचि कार
331.
तुज साधावया एकचि कारण ।
फार जया पुण्य गाठी वसे ॥१॥
तेव्हा निजमन वश पै आपण ।
जैसे केले जाण तैसे होय ॥२॥
तपाचिया राशी वसे ज्याचे गाठी ।
तेव्हा मन हाती गवसे पा ॥३॥
बहेणि म्हणे मग मन तेचि तृण ।
पाहिजे कारण पुण्यप्राप्ती ॥४॥
