निर्गुण सगुण नाही ज्
329.
निर्गुण सगुण नाही ज्या आकार |होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥
जळी जळंगार दिसे जैशा परी |तैसा निराकारी साकार हा ॥२॥
सुवर्ण की धन धन की सुवर्ण |निर्गुण सगुण ययापरी ॥३॥
असा पूर्णपणे सहजी सहज |सखा केशिराज प्रगटला ॥४॥
पांडुरंगी अंगे सर्व जाले जग |निववी सर्वांग नामा म्हणे ॥५॥
