हांसे आले द्रौपदीसी
324.
हांसे आले द्रौपदीसी । बापा वचन परियेसी ॥1॥
सर्व अरिष्ट भंजना । तुजलागी बाहो कोणा ॥2॥
एक भाव तुझे पायी । यावेगळे काही नाही ॥3॥
थाळी माजी पाहता अन्न । होय क्षुधेचे हरण ॥4॥
थाळी दाखवी देवासी । कैचा विश्वास तुजसी ॥5॥
धांडोळिता कष्टे बहुते । किंचित शाखापत्र तेथे ॥6॥
निर्मी कैवल्याचा दानी । म्हणे नामयाची जनी ॥7॥
