वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

माझिया रे मना सखया स

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075968 · अभंग क्र. ३२३

323.
माझिया रे मना सखया सज्जना ।
ऐक तू प्रार्थना विनवितसे ॥१॥
सांडी हे मीपण अहंतालक्षण ।
निवांत आपण सुखी राहे ॥२॥
किती वणवण करिसी भ्रमण ।
व्यर्थ वायाविण श्रम देही ॥३॥
मायामृगजलापाठी का लागसी ।
कष्ट का भोगसी चौर्‍यांशीचे ॥४॥
येणे काय हित घडो पाहे तुज ।
धरी काही लाज सज्जनांची ॥५॥
बहेणि म्हणे गेले संत जया वाटा ।
पावले ते निष्ठा सुखरूप ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग