नामदेवे आजि उपकार के
324.
नामदेवे आजि उपकार केला । हाटाचा हाट चौबारा ठेला ॥१॥
अवघ्या वाणांची देवोनिया गांठ । बांधली मोट सरळ तेणे ॥२॥
अवघ्या पसारा उघड जो होता । झाकिला तत्वता निजबळे ॥३॥
चोखा म्हणे आता वाणचि पावलो । गोणी विसरलो हाटामाजी ॥४॥