गाई गोपांसमवेत गोकुळ
327.
गाई गोपांसमवेत गोकुळिंहुन आला । पाहुनि भक्तिं भुलला वैष्णवाला ॥१॥
मुगुटमनी धन्य पंडलिक नेका । तयालागीं देखा उभा गे माय ॥२॥
युगें अठ्ठावीस जाली परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ॥३॥
ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनी शरण गे माय ॥४॥
