शुक वामदेव व्यास परा
324.
शुक वामदेव व्यास पराशर ।
गेले थोर थ्रोर जेणे पंथे ॥१॥
जेणे पंथे सुखी जाले पै निर्भय ।
मना तेचि सोय धरी का रे ॥२॥
वसिष्ठ अंबऋषी सनकादिक पाहे ।
गेले लवलाहे जेणे पंथे ॥३॥
बळी बिभीषण प्रल्हाद वाल्मीक ।
पावले ते सुख जेणे पंथे ॥४॥
ऐसे किती सांगो चहु वर्णांमाझारी ।
जाले संवसारी सुखरूप ॥५॥
बहेणि म्हणे मना धरी रे धारणा ।
लागले चरणा निजभावे ॥६॥
