वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

नव्हे शब्द एक देशी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077461 · अभंग क्र. ३३०

330.
नव्हे शब्द एक देशी । सांडी गिवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥धृपद॥
मोकलिले जावे बाणे । भाता जेणे वाहिला ॥२॥
आता येथे कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥

अर्थ :
माझे शब्द म्हणजे कोण्या एका मताचे खंडन किंवा मंडन करणारे नाहीत किंवाअर्थ : सांगणारे नाहीत. माझी वैखरी वाणी म्हणजे विश्वव्यापक परमात्मा त्याच्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे भात्याने बाणाला बरेच दिवस राखलेले असते परंतु बाण त्याला सोडून धनुष्याला धरून बाहेर सुटतो त्याप्रमाणे माझी वाणी या परमात्म्याच्या आधारावर जगत असते व ते या परमात्मा वाचून अन्य कोठेही मोकाटपणे जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता येथे मी बोलत नसून माझ्या प्रत्येक शब्दावर माझ्या स्वामीचा म्हणजे या विठ्ठल परमात्मा चा शिक्का आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग