वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

कर्माचिया रेखा । नुल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075053 · अभंग क्र. १३५

135.
कर्माचिया रेखा । नुलंधिती अशेषा ।
म्हणोनि विशेषा । केशव सेवा ॥
रामकृष्ण माळा । घाला पा रे गळा ।
अखंड जीवनकळा । राम जपा ॥
करावा विचार । धरावा आचार ।
करावा परिकर । रामनामी ॥
सकळांचा सकळी । त्याने तू आकळी ।
जिव्हा हे वाचाळी । रामरती ॥
रिघे रे शरण । तुज नाही मरण ।
ठाकिसी चरण । श्रीविठ्ठलाचे ॥
निवृत्ती प्रसादे जोडे । विठ्ठलनामे घडे ।
ज्ञानदेव बागडे । पंढरीये ॥

अर्थ :
कर्माची विहित रेखा न ओलांडता त्या कर्माचा नाश करण्यासाठी विशेष सेवा केशवाची करावी. रामकृष्णनामाची माला घेऊन अखंड जीवनभर त्या रामनामाचा जप करावा. त्याच रामनामाला आपला विचार व आचार करावा. इतर बडबड न करता सतत रामनामात रत राहुन त्याचे आकलन करुन घ्यावे. त्या श्री विठ्ठलाचे चरण शरण जाऊन पकडले की मरणाचे भय उरत नाही. मी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ते विठ्ठल नामाचा प्रसाद मिळाला त्यामुळे मी पंढरीत बागडलो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग