बोला बोल विरहिणी बोल
138.
बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभले । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळे ॥१॥
दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्मे झाले खंडन । का हो यदुनंदन न बोले ॥२॥
विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥
