वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

लोक सकळहि बाहेरी येत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089851 · अभंग क्र. १३२

132.
लोक सकळहि बाहेरी येती ।
तव निर्मळ गगन शुध्द गभस्ती ।
नवा चारा धेनुवा चरती ।
आणि दुभती यथेष्ट ॥१॥
तव गडी अवघे मस्तकावरी ।
धरुनिया होते गिरी ।
गर्वारुढ ते अंतरी ।
आम्ही पर्वत उचलिला ॥२॥
कृष्ण येथे टाळाटाळी ।
करुनिया म्हणावी आपणा बळी ।
ओझीं आमुचिया निढळी ।
आपण मोकळा फुल झळका ॥३॥
कृष्णे जाणोनी मनोगत ।
म्हणे रे गडीहो काढा हात ।
येरु म्हणती तूचि त्वरित ।
जांई येथूनी वेगळा ॥४॥
ओझे आमुचीया निढळी ।
उगीचि टेकिली तुवं आंगोळी ।
यश घेऊनिया वनमाळी ।
वाउगाचि मिरविसी आम्हात ॥५॥
मग त्याते म्हणे श्रीहरी ।
मस्तक तुम्ही काढा तरी ।
सोडुनी पाहता नखाचि वरी ।
धरिला देखती सकळही ॥६॥
मग म्हणती उतरा आता ।
एकल्या नुरवेचि तत्त्वता ।
चौफेरी मस्तकी धरिता ।
कृष्णे काढली आंगोळी ॥७॥
तव ते दडपिली त्यांच्या भारे ।
मेलो मेलो म्हणती पोरे ।
कृष्ण म्हणे तुम्ही बळिये की रे ।
धरा उचलुनि निज शक्ती ॥८॥
निळा म्हणे पुरुषोत्तमा ।
नेणवे म्हणती तुझा महिमा ।
धाव धाव रे मेघ:श्यामा ।
आम्हा वांचवी खचता हा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग