वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

जे शंभूने धरिले मानस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075060 · अभंग क्र. १३३

133.
जे शंभूने धरिले मानसी । तेचि उपदेशिले गिरीजेसी ॥
नाम बरवे बरवे । निज मानसी धरावे ॥
गंगोदकाहुनीनिके । गोडी अमृत जाले फिके ॥
शीतळ चंदनाहुनी वरते । सुंदर सोनियाहुनि परते ॥
भुक्तिमुक्तिदायक । भवबंधनमोचक ॥
बापरखुमादेविवरे । सुलभ नाम दिधले सोपारे ॥

अर्थ :
त्या चांगल्या नामाला शिवशंभुने मनात धरले त्याच नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला तेच नाम निजमानसात दृढ धरावे. ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे. तेच चंद्राहुन शितळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे. ते नाम भक्ती व मुक्ती दायक अ़सुन ते भवबंधनापासुन सोडवते. माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग