राहिला पाऊस निघावे ब
138.
राहिला पाऊस निघावे बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी ॥१॥
दीनबंधू तेव्हा ठेवी पर्वतासी । भेटती देवासी सकळीक ॥२॥
आयुष्य बहुत तुज होवो कृष्णा । वांचविले प्राणा सकळांच्या ॥३॥
विष्णुदास नामा ओंवाळून जाय । येगे माझे माय भेटी देई ॥४॥
