वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 68. ऋषी पत्न्यांकडे अन्नाची मागणी

ऋषी पत्नांकडे अन्नाच

🙏 4. संत नामदेव · ABH-083273 · अभंग क्र. १३२

132.
ऋषी पत्नांकडे अन्नाची मागणी.

गडियांसी तेव्हा सांगितले देवे । स्त्रियांसी सांगावे जाऊनिया ॥१॥
नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥
त्वरे करोनिया गेले स्त्रियांपाशी । सांगितले त्यांसी वर्तमान ॥३॥
ऐकोनिया ऐसेम उठिल्या सत्वर । वर्जिती भ्रतार तेव्हा त्यांचे ॥४॥
एका ब्राह्मणाने स्त्रियेसी बांधिले । प्राणासी सोडिले परीक्षिती ॥५॥
सकुमार सांवळा राजीवलोचन । पहा-ताती कृष्णमुख तेव्हाम ॥६॥
आनंदाने नेत्री वाहाते जीवन । पुसे वर्तमान नामा ह्मणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग