अजन्मा जन्मला अहंकार
134.
अजन्मा जन्मला अहंकार बुडाला । बोध पै ऊठिला गोकुळी रया ॥१॥
आपरूपे गोकुळी आपरूपे आप । अवघेंचि स्वरूप हरिचे जाणा ॥२॥
रूपाचे रूप सुंदर साकार । गोकुळी निर्धार वृंदावनी ॥३॥
निवृत्तीचे पुण्य वेणु वाहे ध्वनि । जनमनमोहनि एकरूप ॥४॥
अर्थ:
आपण चोरलेले गोधन परत गोकुळात दिसल्यामुळे तेंव्हा त्याचा अहंकार गळाला व त्याला शुध्द ज्ञानाचा बोध त्या गोकुळात झाला. त्या स्वरुपात त्याला पाहुन ब्रह्मा समजुन गेला की तो श्रीकृष्ण असुन त्यानेच सर्व रुपाचे धारण केले आहे. हे संपुर्ण गोकुळ त्या रुपाचे आविष्कार दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या मुरलीच्या ध्वनीने जग मोहित होते तो मुरलीचा ध्वनी मी ही ऐकत आहे.
