तुमच्या चरणी जे कांह
136.
तुमच्या चरणी जे कांही आहे । ते सुख पाहे मज द्यावे ॥१॥
सर्वासी विश्रांति तेथे मन ठेवी । ते सुख शांति देई मज देवा ॥२॥
सर्वांभूती दया संतांची ते सेवा हेचि देई देवा दुजे नको ॥३॥
चोखा म्हणे आणिक दुजे नको कांही । जीव तुझे पायी देईन बळी ॥४॥
