युगायुगीं पीडिली विर
137.
युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवी ध्यानीं मनी चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥
विरह गेला सुख झाले अपार । जन्मोजन्मी ची तुटे वेरझार वो ॥धृ.॥
घडता संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥
महिमा वर्णिता विरहा फिटले । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरी दाटले । विरहाचें बीज भाजिले वो ॥३॥
