वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मग तो उतरुनिया गिरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089860 · अभंग क्र. १३३

133.
मग तो उतरुनिया गिरी ।
आले गोकुळा भीतरी ।
तव धावोनिया नरनारी ।
लोटांगणे घालिती ॥१॥
मेघीं सांगता सूरपती ।
आनंदला होता चित्ती ।
तोचि आला गोकुळाप्रती ।
निज नयनी पहावया ॥२॥
तव तो गोंवळ पहिलियाची ऐसे ।
केळवती का नोवरे जैसे ।
गाई चौताळताती हर्षे ।
तैसेचि गोकुळींहिं स्वानंदे ।
गौळी गौळणी मिरवती ॥४॥
इंद्र देखोनिया ते दृष्टी ।
विस्मयापन्न झाला पोटी ।
म्हणे संवर्तकाचिये वृष्टी ।
पुढे कैसी वांचली ही ॥५॥
तस्मात परमात्मा हा श्रीहरी ।
कृष्णवेषे महीवरी ।
अवतरला जाणेनिया अंतरी ।
स्तवन करी निज मूखे ॥६॥
निळा म्हणे शरणांगत ।
म्हणवी घाली दंडवत ।
त्राहे त्राहे म्या महिमा नेणत ।
केला अपराध क्षमा कीजे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग