गोविंदा माधवा केशवा
140.
गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमो ॥१॥
गोवर्द्धनोद्धरा देवा विश्वंभरा । निर्गुण निराकारा तुज नमो ॥२॥
जनार्दना हरि कृपाळू ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥३॥
अव्यक्ता क्षेत्रज्ञ अचिंता कुटस्था भुवनत्रयनाथा तुज नमो ॥४॥
अनंत ब्रह्मांडे तुझिये उदरी । घनश्यामा हरि तुज नमो ॥५॥
देवराया तुझे कोमळ ह्लदय । कृपादृष्टी पाहे मजकडे ॥६॥
तुझा मी किंकर आहे वासुदेवा । अभय या जीवा देई आता ॥७॥
नामा म्हणे घाली चरणासी मिठी । बोले जगजेठी स्वामी माझा ॥८॥
