वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

म्हणती पाठवावा अक्रू

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089836 · अभंग क्र. १३८

138.
म्हणती पाठवावा अक्रूर ।
कृष्णी त्याचा मित्राचार ।
त्याचे नुलंघी तो उत्तर ।
सहसा प्राण गेलिया ॥१॥
देऊनिया उत्तम रथ ।
मूळ पाठवावा तो त्वरित ।
सांगावे भेटीसी उदयत ।
मामा तुझे कंसरावो ॥२॥
अक्रूरा सांगावा हाचि अर्थ ।
जरी तू नाणिसी कृष्ण येथ ।
तरी मम हस्ते तुझा घात ।
होईल जाण तेच क्षणी ॥३॥
राये अक्रर पाचारिला ।
रथ देऊनिया गौरविला ।
म्हणे जाऊनिया आता वहिला ।
भाचा आणी भेटीसी ॥४॥
तयालागी प्राण फुटे ।
घटिका पळहि निमिष न लोटे ।
नणिता लावीन मृत्युवाटे ।
तुज हे निर्धारे जाण पा ॥५॥
आजींचि घेऊनिया तू येसी ।
जरी का आपुल्या निजमित्रासी ।
तरि देऊनिया निज भाग्यासी ।
गौरवीन तुज बहुमाने ॥६॥
निळा म्हणे अक्रूर मनी ।
म्हणे हा पापी पापियाहुनी ।
आणवितो कृष्ण निदानी ।
आपुलिया प्राणा घातावया ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग