ऐशीं निर्धारे विरहिण
134.
ऐशीं निर्धारे विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करी । संतसंग घडलिया धन्य संसारी ॥१॥
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावले सुखधामा ॥धृ.॥
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणे साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥
एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपता स्थिर झाले मन । विरह गेला त्यागुना ॥३॥
