वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

यमधर्म सांगे दूता ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075044 · अभंग क्र. १३७

137.
यमधर्म सांगे दूता । परिसावी निजकथा ।
जेथे रामनाम वार्ता । तया देशा नव जावे ॥
नाम महादोषा हरण । नाम पतितपावन ।
नाम कालिमलदहन । भवबंधन मोचक ॥
जये देशी नाम वसे । नाम श्रवणी विश्वासे ।
गाती नाचती उल्हासे । झणी पाहाल तयांकडे ॥
जये ग्राम हरिपूजन । जये नगर हरिकीर्तन ।
तेथे गेलिया बंधन । तुम्ही पावाल त्रिशुद्धी ॥
जये देशी गरुडटका । कुंचे ध्वज आणि पताका
जेथे संतजन आइका । तया देशा नवजावे ॥
आणिक एक ऐका रे विचारु । जेथे रामनामाचा गजरु ।
तेथे बापरखुमादेविवरु । तयाबळे नागवती ॥

अर्थ :
ज्या गावांत हरिकथा सुरु आहे जेथे रामनाम सुरु आहे तेथे तुम्ही जाऊ नका असे यम आपल्या यमदुतांना सांगत आहे. नाम हे महादोषांचे हरण करते, नाम पतिताला पावन करते, नाम कलिमलाचे दहन करते भवबंधन मोचक असे नाम आहे. ज्या देशात नाम वसते. जेथे नाम ऐकले जाते. नाच गात जेथे नाम घेतले जाते तिकडे तुम्ही यमदुत पाहु ही नका. ज्या गावी हरिपूजन होते ज्या गांवी हरिकीर्तन होते तेथे तुम्ही गेलात तर तुम्हीच बंदीवान व्हाल. ज्या देशात गरुडटके, कुंचे, ध्वज व पताका घेऊन संतजन भजनात रंगले आहेत त्या गांवाला जाऊ ही नका. आणिक एक विचार सांगतो जेथे रामनामाचा गजर होतो तिथे माझे पिता व रखुमाईचे पती स्वतः असतात तिथे तुम्ही यमदुत म्हणुन गेलात तर तुमची नागवण होईल असे माऊली अभंगात सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग