वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ज्या रूपा कारणे वोळं

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090086 · अभंग क्र. १३६

136.
ज्या रूपा कारणे वोळंगति सिद्धि । हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥१॥
ते रूप साजिरे गोकुळी गोजिरे । यशोदे सोपारे कडिये शोभे ॥२॥
न संटे त्रिभुवनी नाकळे साधनी । नंदाच्या आंगणी खेळे हरी ॥३॥
निवृत्ति निधडा रूप चहू कडा । गोपाळ बागडा गोकुळी वसे ॥४॥

अर्थ:
ज्याच्या रुपाचे वर्णन करताना शास्त्रांची बुध्दी हारपते त्याच्या दारी सर्व सिध्दीही सेवेसाठी तिष्ठत असतात. तेच गोजिरे साजिरे रुप यशोदेच्या कडेवर बसुन गोकुळाला दर्शन देत आहे. जे रुप त्रिभुवनाला दिसत नाही कोणत्याही साधनात अडकत नाही ते नंदाच्या अंगणात खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच स्वरुप ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत ते गोकुळात संवंगड्यांबरोबर खेळत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग