पिकलिया सेंद कडुपण ग
138.
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हा केले पांडूरंगे ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे भाग्य या नांवे म्हणीजे । संसारी जन्मीजे याचिलागी ॥४॥
