तुम्हांसी शरण बहुत म
138.
तुम्हांसी शरण बहुत माग आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाही अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांही ते न कळे । नामाचिया बळे काळ कंठी ॥४॥
