सत्य म्हणता माया ज्ञ
139.
सत्य म्हणता माया ज्ञान लया जाय ।
असत्य तरी नव्हे कदा काळी ॥१॥
जाणती अनुभव ज्ञान दृष्टिरूप ।
मायेचे अमूप रूप वाढे ॥२॥
आकारले जे जे मायिक ते खरे ।
शब्द तो निर्धारे मायारूप ॥३॥
ज्ञान तेही माया ध्यान ते मायाचि ।
मायेविण कैची दृष्टी वाढे ॥४॥
जोवरी हे द्विअत मनामाजी वसे ।
तोवरी मायांशे लोकत्रय ॥५॥
बहेणि म्हणे माया लटकी म्हणो नेदी ।
करोनी वेवादी पहा बरे ॥६॥
