सूर्याते निवटी चंद्र
138.
सूर्याते निवटी चंद्राते घोंटी । उन्मनि नेहटी बिंबाकार ॥१॥
ते रूप सावळे योगियाचे हित । देवांचे दैवत कृष्णमाये ॥२॥
सत्रावी उलंडी अमृत पिऊनि । ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥३॥
निवृत्ति अंबु हे वोळले अमृत । गोकुळी दैवत नंदाघरी ॥४॥
अर्थ:
योग्यांच्या ध्यानात चंद्ररुपाला बाजुस करुन ज्ञानसुर्याचा शोध घेतला जातो. व त्या ज्ञानसुर्याचा बिंबाकार ते योगी मनात ठसवतात. चंद्र म्हणजे अंधार व सुर्य प्रकाश हे अज्ञान व ज्ञानाचे रुपक आहे. तेच ज्ञानबिंब सावळे रुप धारण करुन सर्व देवांचे दैवत झाले असुन तेच योग्यांना हितकार आहे. योगी चंद्राच्या सतरावीतुन ते नामामृत घेऊन आपल्या मनात ब्रम्हांडाचे स्वरुप म्हणुन धारण करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, नंदाच्या घरी तेच दैवत अवतरले असुन ते नामामृत त्याने मला ही पाजले आहे.
