वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 69. इंद्र गर्व परिहार

सकळिका तेव्हा देवे आ

🙏 4. संत नामदेव · ABH-083599 · अभंग क्र. १३६

136.
सकळिका तेव्हा देवे आश्वासिले । इंद्रे हे मांडिले विघ्न येथे ॥१॥
महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहे पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
रक्षिणार यांसी आहे मी गोविंद । उतरीन मद तुझा आता ॥३॥
शरणागता मारी ऐसा कोण थोर । मशक पामर पाहू आता ॥४॥
यासाठी करीन सृष्टीचा उभारा । लागो नेदी वारा दु:खाचा मी ॥५॥
गोवर्धना तुम्ही चलारे सकळ । दावितो मी बळ इंद्रा आता ॥६॥
उचलिला गिरी प्रथम अंगुळी नामा म्हणे बळी बाप माझा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग