वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 14. विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

आनुपातें विरहिण बैसे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087422 · अभंग क्र. १३६

136.
आनुपातें विरहिण बैसे । का वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झाले ऐसे । कोणी योगे भेटी नसे ॥१॥
मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ.॥
विरहे बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥
नेणे आपपरावे दुजे कांही । विरहे विरह जडला हृदयी । कोण सोडवी गुरु मज देही । या विराहा अंतपार नाही ॥३॥
ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडले संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखे सुख अपार झाले देख ॥४॥
संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झाले गे माय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग