वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पृथ्वीयेचा गंध उदकीच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076005 · अभंग क्र. १३४

134.
पृथ्वीयेचा गंध उदकीचा रस ।
तेजामाजी अंश आत्मयाचा ॥१॥
परी तो न दिसे ज्ञानचक्षूविण ।
पाहिजे अंजन गुरूकृपेचे ॥२॥
वायूमाजी ज्याचे वसतसे रूप ।
नभी असे दीप आत्मयाचा ॥३॥
बहेणि म्हणे तेथ व्यवहार राहिला ।
जे वेळी पाहिला देवराणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग