वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

नाम पवित्र आणि परिकर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075065 · अभंग क्र. १३६

136.
नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरुहुनि उदारु ।
ते तु धरी का रे सधरु । तेणे तरसी भव दुस्तरु ॥
नरहरिनाम उच्चरी । तेणे तरसी भवसागरी ॥
जपे न लाहसी तपे न लाहसी । क्रिये षट्कर्मे न पवसी ।
नामे एके रे पावसी । स्वर्गी अमृतपान ॥
क्षीर गोड म्हणसी ऐसे । परी तेथेही वीट असे ।
नाम उच्चारिता वाचे । कोटि जन्मांचे पातक नासे ॥
मन मारुनिया सायासे । परी तेथेही अवगुण असे ।
नाम उच्चारिता वाचे । सकळिक ध्यान डोळांदिसे ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे । विपाये नाम आले वाचे ।
जळती डोंगर कल्मषाचे । भय नाही कळिकाळाचे ॥

अर्थ :
पवित्र व परिकर नाम हे कल्पतरु पेक्षा उदार असुन तु त्याला धैर्याने धारण केलेस तर दुस्तर भवसागरातुन तरशील. नरहरिनामाच्या उच्चारणाने भवसागरातुन सहज बाहेर पडशील. त्या भगवंतला प्राप्त करण्यासाठी जप तप करावे लागणार नाही षटकर्म करावी लागणार नाहीत फक्त नाम उच्चाराने स्वर्गात अमृतपान करशील. दुध गोड म्हणावे तरी त्याचा वीट येतो. पण नामाचा वीट येत नाही व त्यामुळे कोटी जन्माच्या पापाचा नाश होतो. सायासाने मन मारुन राहिले तरी त्यात अवगुण आहे. नामाच्या उच्चाराने तु स्वरुपाला प्राप्त होशील. चुकुन जरी माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलनाम मुखाशी आले तरी पापकर्माचे डोंगर जळतात व कळिकाळाचे भय राहात नाही असे माऊली म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग