वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 14. विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

विषय विरह गुंतले संस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087417 · अभंग क्र. १३३

133.
विषय विरह गुंतले संसारी । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारी । यालागी न गुंता संसारी ॥१॥
मज सोडवा तुम्ही संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ.॥
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥
यासी शरण गेलिया वांचुनी । संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावे जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग