वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

जरी तो येईल येथे हरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089847 · अभंग क्र. १३६

136.
जरी तो येईल येथे हरी ।
तरी मी सहसा विलंब न करी ।
धोपटूनिया शिळेवरी ।
तेच क्षणी टाकीन ॥१॥
काळासम तुल्य माझे बळ ।
काय ते करील कृष्ण गोवळ ।
लागो नेदिता एकही पळ ।
निमिषाधेंचि उपटीन ॥२॥
गोकुळाचिये वाटेवरी ।
धुणे माझे निंरतरी ।
परि आलाचि पाहिजे वैरी ।
तुझा आणि माझाही ॥३॥
मागे पाठविले असुर ।
मायावी ते निशाचर ।
ते काय बापुडे किंकर ।
माझिये बळ शक्तीपुढे ॥४॥
राया येथे एक वेळा ।
आणवी पा तया गोवळा ।
मग तू कौतुक पाहे डोळा ।
मृत्युपंथे लावीन ॥५॥
आम्ही तुझे अंगलग ।
सेवक आणि बळिये चांग ।
रोखूनिया असो मार्ग ।
माझे धुणे त्याचि पंथे ॥६॥
निळा म्हणे ऐशा वचनी ।
राजा संतोषविला मनी ।
मग तो उचिताते घेउनी ।
आला आपुलिया मंदिरा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग