जीविंचा जिवलग प्राणा
133.
जीविंचा जिवलग प्राणांचा तो प्राण । धरीन चरण जीवे भावे ॥१॥
आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी । होईल तया घरी पशुयाती ॥२॥
विठ्ठल नामाचा छंद जया मनी । संसार काचणी तया नाही ॥३॥
चोखा म्हणे नाही दुजा छंद मनी । जागृती स्वप्नी पंढरिराव ॥४॥
