वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

न साहात दुजेपण आपणचि

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090017 · अभंग क्र. १३७

137.
न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण । श्रुति जेथे संपूर्ण हरपती ॥१॥
देवरूप श्रीकृष्ण योगिया संजीवन । ते रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥
न दिसे वैकुंठी ते योगियांचे ध्यानबीज । तो गोपाळाचे काज हरि करी ॥३॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारिता माजी घरी । होती मनोरथ पुरी कामसिद्धी॥४॥

अर्थ:
ज्याचे वर्णन श्रुती करु शकत नाहीत ज्याच्या स्वरुपात कोणतेही द्वैत नाही तेच स्वरुप आत्मखुण आहे. तेच देवस्वरुप कृष्णरुप योग्यांना संजिवनी देते तेच रुप हे परिपूर्ण आत्मस्वरुप आहे. जे स्वरुप वैकुंठात दिसत नाही जे स्वरुप योग्यांच्या ध्यानाचे बीज आहे ते सगुण रुपात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या कृपेने मी त्याच नामाचा जप केला त्या मुळे माझे सर्व मनोरथ व इच्छा पूर्ण झाल्या.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग