वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

नानापरी समजाविते परी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073272 · अभंग क्र. १३३

133.
नानापरी समजाविते परी न राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगी झडकरी ।
कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदारी ॥१॥
राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा ॥धृ॥
क्षणभरी घरी असता करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जाता आळ घेती गौळणी ।
थापटोनि निजविता पळोनि जातो राजद्वारा ॥२॥
राधा घेऊनि हरिला त्वरे जात मंदिरी । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी ।
एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग