घरा जावे ऐसे सांगे प
133.
घरा जावे ऐसे सांगे पुरुषोत्तम । ऐकोनिया श्रम फार होय ॥१॥
दयानिधि ऐके अगा मेघश्यामा । धाडू नको आह्मा येथूनिया ॥२॥
तुजसाठी आह्मी सोडिले भ्रतारा । चरणी देई थारा देवराया ॥३॥
देव ना संसार आम्हा झाले कृष्णा । सांगावे हे कोणा दु:ख आता ॥४॥
तुमचे भ्रतार वदिती आम्हांसी । सांग हषीकेशी भिऊ नका ॥५॥
सांगतांची ऐसे चालियेल्या सर्व । पाहाती केशव वेळोवेळा ॥६॥
द्विजाचे मानसी होय अनुताप । द्विजाचे मानसी होय अनुताप । भिंदिती आप आपणाते ॥७॥
भोजन करूनी गडी रामकृष्ण । निघती तेथून नामा म्हणे ॥८॥
