लोलो लागला अंबेचा ।
136.
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥1॥
आदि ठाणे पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥2॥
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥3॥
शुद्ध देखोनिया भाव । पोटी आले नामदेव ॥4॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥5॥