काकुळती येती सकळिक ल
135.
काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आता ॥१॥
मागे बहुतापरी रक्षियले आह्मा । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥
कोण तुजविण आह्मांसि रक्षिता । उदारा अनंता जगजेठी ॥३॥
शरण शरण अगा वासुदेवा । अच्युता माधवा नारा-यणा ॥४॥
विलंब केलिया जातील रे प्राण । धरिती चरण नामा ह्मणे ॥५॥
