वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आकाशीचा सूर्य जळात ब

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075816 · अभंग क्र. १३७

137.
आकाशीचा सूर्य जळात बिंबला ।
तरी काय बुडाला तयामाजी ॥१॥
तैसा या शरीरी अलिप्तचि असे ।
इंद्रियसमरसे असोनिया ॥२॥
चुंबकदर्शने लोखंडा चळण ।
आत्मा देही जाण तैसा असे ॥३॥
पूर्ण चंद्र होता सिंधूसी भरते ।
तैसा देह वर्ते आत्मयाने ॥४॥
आलिया वसंत येती पुष्पेफळे ।
तैसा देह चळे आत्मसत्ता ॥५॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वांही अतीत ।
अनुभवे पदार्थ सर्व कळे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग