वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 69. इंद्र गर्व परिहार

इंद्रगर्वपरिहार

🙏 4. संत नामदेव · ABH-083600 · अभंग क्र. १३४

134.
इंद्रगर्वपरिहार

इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-निया ॥१॥
क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हा आता ॥२॥
पोरांच्या बुद्धीने वर्तताती सर्व । धरूनिया गर्व तेची करी ॥३॥
प्रलय मेघाच्या काढिल्या श्रृंखला । वर्षावे गोकुळा जा-ऊनिया ॥४॥
आज्ञा म्हणोनिया वंदियेला इंद्र । कोपे जैसा रुद्र प्रलयींचा ॥५॥
मुसळाच्या धारा मेघ वर्षताती । गारा पडताती शिळा ऐशा ॥६॥
मरताती पक्षी श्वापदे अपार । हिंवे नारीनर कांपताती ॥७॥
नामा म्हणे गायी हंबरडा ह्मणीती । येऊनी पडती कृष्णापुढे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग